Eknath Shinde | लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्हणाले….
अहिल्यानगरमधील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मान्यवरांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली.

या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांनी चौंडीतील जनतेला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला. यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, असेही सांगितले.
यानंतर चौंडीच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर झाला असून लवकरच विविध विकासकामांचे भूमीपूजन होणार असल्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी यावेळी नमूद केले. “1992 साली जयंती उत्सवाला अल्प प्रतिसाद मिळत होता, मात्र आता हा उत्सव राज्यस्तरीय झाला आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या घोषणाबाजी आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली.