AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार होणार | Lata Mangeshkar Death | Mumbai |

शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार होणार | Lata Mangeshkar Death | Mumbai |

| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 3:09 PM
Share

संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (national mourning) जाहीर करण्यात आला आहे.

आपल्या अलौकीक आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (national mourning) जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्क (shivaji park) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांची मृत्यूशी झूंज सुरू होती. या काळात त्यांनी न्यूमोनियावर मातही केली होती. त्यांना कोरोना झाला होता. त्यावरही उपचार सुरू होते. पण त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

Published on: Feb 06, 2022 02:11 PM
Follow Us