छावा संघटनेकडून लातूर बंदची हाक; सुरज चव्हाणांवर गुन्हा दाखल
अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीनंतर आज छावा संघटनेने लातूर बंदची हाक दिलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते उधळले, ज्यामुळे जोरदार हाणामारी झाली. या घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यामुळे छावा संघटनेसह इतर पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घाडगे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या अपोलो रुग्णालयात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. या कार्यकर्त्यांनी लातूर बंदची हाक दिली असून, आज लातूर शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या बंदमध्ये भाजप आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला आहे. तर बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी देखील दुकान बंद ठेऊन बंदच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला बघायला मिळत आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

