Laxman Hake : यापुढे OBC समाज अजितदादांना मतदान करणार नाही, 4 जुलैला मोठी बैठक; हाकेंचा निर्धार काय?
'महाराष्ट्रातील काही मोजक्या ओबीसी नेत्यांची बैठक मुंबईत बोलवली आहे. तर ओबीसी समाजाकडून १५ जुलैला मनोज जरांगे पाटलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय', असं लक्ष्मण हाके म्हणाले
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मण हाके यांनी 4 तारखेला ओबीसी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. तर 15 जुलै रोजी ओबीसी समाजाकडून पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर ओबीसी समाज यापुढे अजित पावरांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याचं लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. जे जे खासदार आमदार मनोज जरांगे पाटील यांना भेटतात त्यांची यादी आम्ही बनवली आहे. या लोकांना भविष्यात ओबीसी मतदान करणार नाही, असंही लक्ष्मण हाकेंकडून सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे बारामतीच्या माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी सभासदांना पैसे वाटले असं म्हणत हाकेंनी गंभीर आरोप केलेत.