राज ठाकरेंच्या सल्ल्यावर अजित पवारांचे त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर, पहा काय म्हणाले…
'लोकमत'च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी अमृता फडणवीसांच्या रॅपिड फायर प्रश्नावर राज ठाकरेंनी अजितदादांना सल्ला दिला होता.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) याचं नाव चांगलचं चर्चेत येत आहे. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या अनेक ठिकाणी बॅनर्स लागत आहेत. त्यावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरून त्यांना डिवचलं होतं. तसेच अजित पवार यांना सल्ला देत जरा काकांकडे लक्ष द्यावं असं म्हटलं होतं. त्यावरून आता अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी अमृता फडणवीसांच्या रॅपिड फायर प्रश्नावर राज ठाकरेंनी अजितदादांना सल्ला दिला होता. त्याला राज ठाकरे यांनी जसं त्यांच्या काकांवर लक्ष ठेवलं, तसं मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

