AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP : विरोधकांना मतदार सोडा, कार्यकर्ताही मिळणार नाही, बावनकुळेंचे पदाधिकाऱ्यांना अव्हान

| Updated on: Sep 12, 2022 | 9:02 PM
Share

राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूकांच्या काळात कार्यकर्ताही मिळणार नाही याची काळजी घ्या असे सांगितले आहे. विरोधकांच्या खालच्या बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवेशही आता भाजपामध्ये होत आहे. त्यामुळे विरोधकांना कोणतीही संधी देऊ नका, असे बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबई : ‘मिशन लोकसभा’ या घोषवाक्याने (BJP Party ) भाजप पक्ष निवडणूकांच्या तयारीला लागला आहे. शिवाय (Amit Shah) गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपामध्ये उत्साह संचारला असून प्रदेशाध्य (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष संघटनेवर भर देत आहेत. त्यांनी आता विरोधकांना मतदार तर सोडाच पण कार्यकर्तेही मिळणार नाहीत अशी रणनीती आखा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूकांच्या काळात कार्यकर्ताही मिळणार नाही याची काळजी घ्या असे सांगितले आहे. विरोधकांच्या खालच्या बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवेशही आता भाजपामध्ये होत आहे. त्यामुळे विरोधकांना कोणतीही संधी देऊ नका, असे बावनकुळे यांनी सांगितले. तर कार्यक्रम दरम्यान माझा सत्कार करु नका पण विरोधकांना कोणतीही संधी देऊ नका असेही त्यांनी अवाहन केले आहे.

Published on: Sep 12, 2022 09:02 PM