मुंब्र्यातील अपघातानंतर मध्य रेल्वेनेकडून गंभीर दखल, ‘त्या’ वळणावर आता…
मुंब्रा रेल्वे स्थानक फास्टट्रॅक वरती अपघात झाल्यानंतर रेल्वेने खबरदारी म्हणून वळण मार्गावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. मुंब्र्यातील अपघातानंतर मध्य रेल्वेनेकडून ही गंभीर दखल घेण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी झालेल्या ट्रेन अपघातानंतर मुंबईकरांना मोठा धसका बसला. कसारा रेल्वे स्थानकाकडून मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी लोकलच्या दारात लटकत होते. लोकलच्या दरवाज्यात लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि ट्रॅकवर पडले. ज्यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मध्य रेल्वेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान, ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून वळण मार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेनचा वेग कमी करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे अजून देखील रेल्वे प्रवासी रेल्वेच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत आहे. काल ज्या पद्धतीने दोन्ही गाड्या आजूबाजूला फास्टट्रॅक वरून धावत होता त्यावेळी असणारा वेग आणि आता दोन्ही गाड्या आजूबाजूच्या ट्रॅकवरून धावत असताना त्यांच्यातील वेगात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वेने या वळण मार्गावरती खबरदारी म्हणून रेल्वेचा फास्ट ट्रॅकचा वेग कमी केल्याचे पाहायला मिळत आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी

इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला

वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...

राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
