Lok sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील ‘हे’ टॉप 5 उमेदवार सर्वाधिक मतांनी आघाडीवर
निकालाची मतमोजणी सुरू असताना या फैसल्याआधी राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. मात्र सध्या राज्यातील काही उमेदवार हे सर्वाधिक मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा कोण आहेत महाराष्ट्रातील 'हे' टॉप 5 उमेदवार सर्वाधिक मतांनी आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू असताना या फैसल्याआधी राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. मात्र सध्या राज्यातील काही उमेदवार हे सर्वाधिक मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पाडवी ६८ मतांनी आघाडीवर आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष विशाल पाटील हे १६ हजार ५६१ मतांनी पुढे आहेत. शिरूरमधून अमोल कोल्हे हे १८ हजार ६७४ मतांनी पुढे आहेत. संभाजीनगरमधून इम्तियाज १३ हजारांहून जास्त मतांनी पुढे आहेत. नांदेड चौथ्या फेरीअखेर भाजपचे चिखलीकर १ हजार ११३ मतांनी आघाडीवर आहेत. बारामतीत तिसऱ्या फेरी अखेर सुप्रिया सुळे १४ हजारांनी पुढे आहेत. तर नागपुरातून नितीन गडकरी हे २१ मतांनी आघाडीवर आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

