Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सभागृहातील सुरू असलेला गदारोळ थांबवून कामकाज नियमितपणे सुरू राहावं, यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांशीही संवाद साधण्यात आला. संसदेतील प्रलंबित कामकाज पूर्ण करण्यासाठी सहमतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारकडून सायंकाळी 5 वाजल्यापासून सभागृहाचं कामकाज सुरळीत सुरू व्हावं, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समन्वय साधण्यावर भर देण्यात आला आहे.
संसदेत पुन्हा गदारोळ होऊ नये आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा तसेच विधेयकांवरील कामकाज विनाअडथळा पार पडावं, या उद्देशाने लोकसभा अध्यक्षांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचं समोर आलं आहे.