चंद्रग्रहणामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी सोवळ्यात, बघा लोभस रूपडं
VIDEO | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मुर्ती पांढऱ्या वस्त्रात सोवळ्यात झाकण्यात आली होती, दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
धाराशिव, २९ ऑक्टोबर २०२३ | महाराष्टाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मुर्ती पांढऱ्या वस्त्रात सोवळ्यात झाकण्यात आली होती. देवीच्या ग्रहण काळातील रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक वर्षानंतर पौर्णिमादिवशी खंडग्रास ग्रहण आल्याने हा एक दुर्मिळ योग होता. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. तर यंदा खंडग्रास चंद्रग्रहण योग चालून आल्याने ग्रहणाच्या वेधकाळात देवीची मूर्ती निद्रावस्थेत होती. ग्रहण सुरू होण्यापूर्वी मूर्ती सिंहासनारूढ करून ग्रहण काळात जवळपास दीड तास ती सोवळ्यात झाकून ठेवण्यात आली होती. दरम्यान, ग्रहण सुटल्यानंतर देवीची काकड आरती करून देवीला पंचामृत अभिषेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

