AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : पंचतारांकित पाहुणचार, विशेष ट्रीप अन् चांदीच्या ताटात राजेशाही जेवण; ज्यांच्यावर काटकसरीची जबाबदारी तेच करताय उधळपट्टी

Maharashtra Politics : पंचतारांकित पाहुणचार, विशेष ट्रीप अन् चांदीच्या ताटात राजेशाही जेवण; ज्यांच्यावर काटकसरीची जबाबदारी तेच करताय उधळपट्टी

| Updated on: Jun 25, 2025 | 10:49 AM
Share

Luxury Feast for Estimates Committee Members : संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी एका खासदारावर किंवा आमदारावर तब्बल 4500 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.

संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नांचा बेत केला गेला आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट सध्या करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते, त्याच समितीच्या परिषदेत सदस्यांसाठी राजेशाही थाट केल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे राज्य निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे.

मुंबईत संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपावेळी शाही भोजनाचा बेत करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, या भोजनासाठी एका खासदारावर किंवा आमदारावर तब्बल 4500 हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर या सर्व पाहुण्यांना पंचतारांकित पाहुणचार देण्यात आला. सर्व राज्यातील अंदाज समितीच्या सदस्यांच्या राहण्याची सोय देखील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली. त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवले गेले. सर्व पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रीपचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

Published on: Jun 25, 2025 10:45 AM