Manisha Kayande : महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा तर आताचे सरकार कसे? कायंदेंनी असे केले शिंदे सरकारचे वर्णन
आता शिंदे सरकारची स्थापना झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार हाकत आहेत. त्यामुळे हे सरकार म्हणजे स्कूटरचे सरकार आहे. जे दाखवले जात आहे प्रत्यक्षात तसे नसून मंत्रालयातच यांनी दोन वॉररुम केल्या असल्याचे शिवसेना प्रवकत्या मनिषा कायंदे यांनी सांगितले आहे.
मुंबई : (MVA) महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर हे (MVA Government) सरकार तीन चाकी रिक्षाप्रमाणे आहे. त्यामुळे कधी कोसळेल हे सांगता येत नाही असा आरोप सातत्याने केला जात होता. (BJP Party) भाजप पक्षाने हे सरकारमध्ये एक वाक्यता नाही असा आरोप करीत केव्हाही तीन चाकी रिक्षाची पलटी होऊ शकते असा अंदाज वर्तवला होता. आता शिंदे सरकारची स्थापना झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार हाकत आहेत. त्यामुळे हे सरकार म्हणजे स्कूटरचे सरकार आहे. जे दाखवले जात आहे प्रत्यक्षात तसे नसून मंत्रालयातच यांनी दोन वॉररुम केल्या असल्याचे शिवसेना प्रवकत्या मनिषा कायंदे यांनी सांगितले आहे. तर उपमुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

