चिंचवड पोटनिवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राष्ट्रवादीचे नाना काटे म्हणताय, ‘आम्ही पुन्हा एकदा…’
VIDEO | चिंचवड पोटनिवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांची प्रतिक्रिया
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा दारूण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना या पोटनिवडणुकीत 1 लाख 35 हजार 494 मतं मिळाली. तर नाना काटे यांना 99 हजार 424 मतं मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाना काटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चिंचवडमध्ये सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले आणि प्रचारही चांगला झाला होता. बंडखोरीचा नक्कीच फटका बसलेला आहे. कारण ते मतदान देखील आमचंच आहे. त्यामध्ये काही वंचितचं देखील मतदान असू शकतं. ते मतदानदेखील महाविकास आघाडीचं असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पराभवानंतर आम्ही पुन्हा एकदा जोमाने काम करु, असेदेखील नाना काटे यांनी यावेळी म्हणाले.
कोकाटेंविरोधात इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं लिलावतीत दाखल, झालं काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

