शनिवारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. लाखोंच्या संख्येने शिवसैनिक सभेला हजर होते. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंची सभा झाली नसल्याने अनेकांना सभेबाबत उत्सुकता होती. उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला त्याचबरोबर भाजपची खेळी सध्या कशा पध्दतीने सुरू आहे हे सुध्दा सांगितले. देवेंद्र फडणवीसांचं वजन इतकं आहे की, ते आयोध्येत बाबरीवरती जरी चढले असते, तरी ती कोसळली असती. त्याला रविवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी देखील उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्विट केल आहे. “वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया” ट्विटमध्ये अशा पद्धतीचा आशय लिहिला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट केल्यापासून त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना कमेंट करून विविध प्रश्न विचारले आहे.