VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 5 October 2021

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवत परिवर्तन पॅनलचं खातं उघडलं आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे या निवडणुकीच्या निमित्त आमने सामने आल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं. 4 ऑक्टोबरला जिल्हा बँकेसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या मतमोजणी पहिला निकाल हा बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांच्या परिवर्तन पॅनलच्या बाजूनं लागला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI