MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |7 AM | 23 October 2021

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 23, 2021 | 8:29 AM

गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. सध्या काठावरच्या पाठिंब्यावर गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे. आगामी विधानसभेत थोड्या जरी जागांचा फटका बसला तर भाजपच्या हातातून गोव्यासारखं महत्वाचं राज्य जाऊ शकतं. त्यातच गोव्यात टीएमसी सक्रिय झालीय. केजरीवालांची आपही कामाला लागलीय. टीएमसीनं तर एक माजी मुख्यमंत्रीच गळाला लावलाय. त्यामुळे सुशेगात गोव्यात अचानक मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो असं दिसतंय. दिल्लीत ह्याच बदलांवर शहा-नड्डा-फडणवीस-सावंत अशी बैठक पार पडली.

उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजपा गोव्यातही तशीच खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हटवून त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री केली जाण्याची शक्यता दिल्लीतल्या वर्तूळात वर्तवली जातेय. आज प्रमोद सावंत यांना तातडीनं दिल्लीला बोलवण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्याच बैठकीत गोव्याचा मुख्यमंत्री बदलला जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. सध्या काठावरच्या पाठिंब्यावर गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे. आगामी विधानसभेत थोड्या जरी जागांचा फटका बसला तर भाजपच्या हातातून गोव्यासारखं महत्वाचं राज्य जाऊ शकतं. त्यातच गोव्यात टीएमसी सक्रिय झालीय. केजरीवालांची आपही कामाला लागलीय. टीएमसीनं तर एक माजी मुख्यमंत्रीच गळाला लावलाय. त्यामुळे सुशेगात गोव्यात अचानक मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो असं दिसतंय. दिल्लीत ह्याच बदलांवर शहा-नड्डा-फडणवीस-सावंत अशी बैठक पार पडली.

Published on: Oct 23, 2021 8:29 AM
Follow Us