अजित पवारांनी कारखाने विक्रीची लिस्टच दिली; सोमय्या म्हणतात, दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला

साखर कारखान्यांवर पडणाऱ्या धाडी आणि त्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिली. (kirit somaiya reply to ajit pawar to his clarification)

अजित पवारांनी कारखाने विक्रीची लिस्टच दिली; सोमय्या म्हणतात, दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 4:24 PM

मुंबई: साखर कारखान्यांवर पडणाऱ्या धाडी आणि त्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिली. कारखान्यांची विक्री आणि खरेदीची लिस्टच त्यांनी सादर केली. मात्र, त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खिल्ली उडवली आहे. पीआर एजन्सीने दिलेली यादी त्यांनी वाचून दाखवलेली दिसते, असा चिमटा काढतानाच दुनिया की सैर करलो. पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांनी त्यांच्या कंपन्या आणि त्यातील गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या बहिणींच्या आर्थिक व्यवहारावरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. बिल्डरबरोबरांच्या संबंधावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. स्पार्कलिंक बाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्रीतून 2009मध्ये 50 कोटी मिळाले होते. या सर्वांना त्यांनी बगल दिली आहे. गुरु कमोडिला कारखाना कसा दिला. कमोडिटीजला कारखाना चालवण्याचा गंधही नव्हता. त्यांचा संबंधही नव्हता. तरीही त्यांना कारखाना कसा विकला? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

सोमय्यांचे काही सवाल

ओमकार बिल्डर जेलमध्ये आहे. त्याच्याशी झालेला व्यवहार, स्पार्कलिंक अॅग्रो कंपनीने त्यांना दिलेले 20 कोटी रुपये, शिवालिकने दिलेली रक्कम यावर ते गप्प का आहेत? जरंडेश्वर सहकारी कारखाना साखर कारखाना 45 वर्षाच्या लीजवर कसा काय दिला? जर गुरु कॉमेडीजने तो विकत घेतला. त्यानंतर त्यांनी तो चालवायला 2045 पर्यंत कसा दिला? आणि जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे मालक कोण आहेत? आता कोण आह? त्याचा शेअर होल्डर तो कारखाना कोण चालवतो? असे सवालही त्यांनी केले.

ईडी चौकशी व्हायलाच हवी

बिल्डरांकडे 184 कोटी रुपये सापडल्याचं शरद पवार आणि सुप्रिया सुळे सांगत आहेत. मग ज्या बिल्डरांवर या धाडी पडल्या ते अजित पवारांचे पार्टनर आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पवारांचे यांच्याशी आर्थिक लागेबांधे आहेत का? त्यांच्याकडून अजित पवारांना कधी तरी रकमा आल्या आहेत का? या सर्वांबाबत अजितदादा गप्प का आहेत? या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होणार आहे आणि अशी चौकशी झालीच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. जे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत, त्याला अजित पवारांनी बगल दिली आहे. जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत. आता या प्रकरणाची ईडीने चौकशी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या

VIDEO: जरंडेश्वरसह कोणता कारखाना कधी, कुणाला आणि कितीला विकला?; अजित पवारांनी सादर केली जंत्री

आगीला जबाबदार कोण? फायर सिस्टम बंद, महापौर म्हणतात, सोसायटी मॅनेजमेंट, सिक्युरिटीवर कारवाई होणार

(kirit somaiya reply to ajit pawar to his clarification)

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.