AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: जरंडेश्वरसह कोणता कारखाना कधी, कुणाला आणि कितीला विकला?; अजित पवारांनी सादर केली जंत्री

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अखरे पत्रकार परिषद घेऊन जरंडेश्वर साखर कारखाने आणि राज्यातील विक्रीला गेल्या इतर कारखान्यांची सविस्तर माहिती दिली. (Deputy Chief Minister ajit pawar release list of sugar factory sales)

VIDEO: जरंडेश्वरसह कोणता कारखाना कधी, कुणाला आणि कितीला विकला?; अजित पवारांनी सादर केली जंत्री
ajit pawar
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 3:33 PM
Share

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अखरे पत्रकार परिषद घेऊन जरंडेश्वर साखर कारखाने आणि राज्यातील विक्रीला गेल्या इतर कारखान्यांची सविस्तर माहिती दिली. साखर कारखाने कवडीमोल भावात विकल्या गेल्याच्या आरोपांनाही उत्तर देताना कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला त्याची आकडेवारीच अजित पवारांनी सादर केली.

अजित पवार यांनी याच पत्रकार परिषदेत जरंडेश्वर साखर कारखान्याची कुंडली मांडली. हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर सुगर मिल काढली. त्यांचं कुटुंब त्यात होतं. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहेत. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

3 कोटीलाही कारखान्याची विक्री

अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच आज जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही केला. 2013 लातूरचा प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना 69 कोटी 75 लाखाला विकला गेला. लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याची खरेदी केली. सर्वाधिक किंमती विकल्या गेलेला हा कारखाना आहे. तर, 2013मध्ये नागपूरचा श्रीराम सहकारी साखर कारखाना 11 कोटी 97 लाखाला विकण्यात आला. कोल्हापूरच्या व्यंकटेश्वरा प्रॉजेक्ट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला. हा कारखाना सर्वात कमी किंमतीत विकला गेल्याचं त्यांनी सांगितलं.

अनेक चौकश्या झाल्या, पण काहीच निष्पन्न झालं नाही

महाराष्ट्रातील साखर कारखानदारी बद्दल खूप काही बोललं गेलं. खूप बातम्या आल्या. या गोष्टीला 12 ते 15 वर्ष झाले या बातम्या येत असताना मी उत्तर देत नव्हतो. पण आता अतिरेक झाला आहे म्हणून उत्तर देत आहे. त्याकाळात 25 हजार कोटी, काहींनी 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नवीन सरकार आलं त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्न झालं नाही. एसीबीने चौकशी केली. त्यातही स्पष्ट झालं नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झालं नाही, असं पवार यांनी सांगितलं. तसेच 65 साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 64 सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतले. काही लोकांनी चालवायला घेतले तर काहींनी इतरांना चालवायला दिले. पण काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

कोणता कारखाना कितीला विकला

>> 2007मध्ये नागपूरचा राम गडकरी सहकारी साखर कारखाना विकला गेला. 12 कोटी 95 लाखाला विकला. नगरच्या प्रसाद शुगर्स कंपनीला विकला गेला.

>> 2008 मध्ये अमरावतीचा श्री अंबादेवी सहकार कारखाना 15 कोटी 25 लाखला विकला गेला. मुंबईतील कायनेटिक पेट्रोलियम कंपनीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2009मध्ये वर्ध्याचा महात्मा सहकारी साखर कारखाना 14 कोटी 10 लाखाला विकला गेला. नागपूरच्या महात्मा शुगर्स अँड पॉवर्स या कंपनीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2009 मध्ये भंडाऱ्याचा वैनगंगा सहाकरी कारखाना 14 कोटी 10 लाखाला विकला गेला. वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेडने हा कारखाना खरेदी केला.

>> 2009मध्ये यवतमाळच्या शंकर साखर कारखाना 19 कोटी 25 लाखाला विकला गेला. जालन्याच्या सागर वाईन्सने हा कारखाना विकत घेतला. नंतर त्यांनी डेक्कन शुगरला विकला.

>> 2009मध्ये अकोला जिल्हा सहकारी साखर कारखाना 17 कोटी 10 लाखाला विकला गेला. मुंबईच्या व्यंकटेश्वर अॅग्रो शुगर प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>>  2009मध्ये अमरावतीचा कोंडेश्वर कारखाना 14 कोटी 72 लाखाला विकला गेला. जयसिंगपूरच्या सुदीन कन्स्लटन्सी प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2009मध्ये नांदेडचा शंकर साखर कारखाना 14 कोटीला 75 लाखाला विकला गेला. नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याने हा कारखाना विकत घेतला.

>> 2010मध्ये साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना 66 कोटी 75 लाख विकला गेला. हा कारखाना मुंबईच्या गुरु कमोडिटीने विकत घेतला.

>> 2010मध्ये परभणीचा नरसरी साखर कारखाना 40 कोटी 25 लाखाला विकला गेला. मुंबईच्या त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2011मध्ये लातूरचा बालाघाट सहकारी साखर कारखाना 31 कोटी 36 लाखाला विकला गेला. लातूरच्याच सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने हा कारखाना विकत घेतला.

>> 2011 मध्ये नांदूरबारचा पुष्पदंतेश्वर साखर कारखाना 45 कोटी 48 लाखाला विकला गेला. मुंबईच्या अॅस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला. नंतर त्यांनी आयान एलएलपी शुगर लिमिटेडला हा कारखाना विकला.

>> 2012 मध्ये सांगली जिल्ह्यातील जतमधील राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी कारखाना 47 कोटी 86 लाखाला विकला गेला. सांगलीच्याच राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना विकत घेतला.

>> 2012मध्ये जालन्यातील सहकारी साखर कारखाना 42 कोटी 31 लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या तापडीया कन्ट्रक्शनने हा कारखाना विकत घेतला.

>> 2012मध्ये नांदेडमधील हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना 45 कोटी 51 लाखाला विकला गेला. नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना विकत घेतला. नंतर सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडला त्याची विक्री करण्यात आली.

>> 2012मध्ये नांदेडचा जय अंबिका सहकारी साखर कारखाना 33 कोटी 48 लाखाला विकला गेला. कुंटुर शुगर अॅग्रो लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2012मध्ये औरंगाबादचा कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटी 20 लाखाला विकला गेला. हा कारखाना बारामती अॅग्रो लिमिटेडने विकत घेतला.

>> 2013मध्ये नागपूरचा श्रीराम सहकारी साखर कारखाना 11 कोटी 97 लाखाला विकण्यात आला. कोल्हापूरच्या व्यंकटेश्वरा प्रॉजेक्ट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013मध्ये औरंगाबादचा घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना 18 कोटी 62 लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013मध्ये जालन्याचा बागेश्वरी सहकारी कारखाना 44 कोटी 10 लाखाला विकला गेला. पुण्याच्या श्रद्धा एजन्सीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013मध्ये जळगावचा संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना 30 कोटी 85 लाखाला विकण्यात आला. पुण्याच्या श्रद्धा (मुक्ताई) एजन्सीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013 लातूरचा प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना 69 कोटी 75 लाखाला विकला गेला. लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याची खरेदी केली.

>> 2014मध्ये सांगलीचा निनाईदेवी सहकारी साखर कारखाना 24 कोटी 30 लाखाला विकला गेला. दालमिया शुगर लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2014 मध्ये नगरचा नगर तालुका सहकारी कारखाना 38 कोटी 25 लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या पियुष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरने हा कारखाना विकत घेतला.

>> 2015मध्ये बुलढाण्याचा शिवशक्ती आदिवासी सहकारी साखर कारखाना 18 कोटी 19 लाखाला विकला गेला. पुण्याच्या बिज सेक्युअर लँप्सने हा कारखाना विकत घेतला.

>> 2015 नगरच्या पारनेर सहकारी लिमिटेड हा कारखाना 31 कोटी 75 लाखाला विकण्यात आला. पुण्याच्या क्रांती शुगरने हा कारखाना विकत घेतला.

>> 2016मध्ये यवतमाळचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना हा 43 कोटी 95 लाखाला विकला गेला. नॅचरल शुगर्स अँड अलाईड इंडस्ट्रीजने हा कारखाना विकत घेतला.

>> 2016मध्ये नांदेडचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना 28 कोटी 4 लाखाला विकला गेला. नांदेडच्या शिवाजी सर्व्हिस स्टेशनने हा कारखाना विकत घेतला.

>> 2017मध्ये सोलापूरच्या संतनाथ सहकारी कारखाना 13 कोटी 23 लाखाला विकला गेला.

>> 2020मध्ये सांगलीतील तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना 37 कोटी 67 लाखाला विकला गेला. सांगलीच्या एसजीझेड अँड एसजीए शुगरने हा कारखाना विकत घेतला.

संबंधित बातम्या:

गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

(Deputy Chief Minister ajit pawar release list of sugar factory sales)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.