MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 September 2021

भारतासह जगावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने दिलेलं योगदान यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता या दोन्ही देशांचे कान उपटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात ठणकावलं. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये. तुम्ही दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर केला तर तो तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला ठणकावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना हा इशारा दिला. मोदींनी हिंदीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. मोदी यांनी आपल्या तब्बल अर्ध्या तासाच्या भाषणात भारताची संस्कृती, परंपरा आणि मोदी सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कामाची माहिती जगाला दिली. तसेच भारतासह जगावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने दिलेलं योगदान यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता या दोन्ही देशांचे कान उपटले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI