AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 8:29 AM
Share

महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते, असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.

आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भाजप सज्ज आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलाय. महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते, असा टोलाही पाटील यांनी लगावलाय. (Chandrakant Patil claims that BJP is ready to win the Assembly elections on its own)

दरम्यान, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे. राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व 48 जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत असल्याचं पाटील म्हणाले.

Published on: Oct 03, 2021 08:28 AM