MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 18 December 2021
आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली.
आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. कदम यांनी ही खदखद व्यक्त करतानाच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरही सवाल केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप खोडून काढतानाच अनिल परब यांच्यामुळे पक्ष रसातळाला जात असल्याचंही स्पष्ट केलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. आमचे वय 60-70 वर्ष झाली आहेत. आता आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, नक्की?. मी त्यांन हो साहेब म्हणालो. पण जेव्हा मंत्र्यांची लिस्ट पाहिली, तेव्हा त्यात सुभाष देसाईंचं नाव होतं. देसाईंचं नाव पाहून मला वाईट वाटलं. दु:ख झालं. मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून वाईट वाटलं नाही. तर ज्येष्ठांना मंत्रिपद देऊ नका अशी विनंती केल्यानंतरही मंत्रिपद दिल्या गेल्याचं वाईट वाटलं, असं कदम म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

