MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 28 September 2021

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तीन नेते म्हणजे शिवसेना नाही. ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तीन नेते म्हणजे शिवसेना नाही. ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. (three leaders means not whole shiv sena says sudhir mungantiwar)

सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हा यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यापूर्वीही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा का ओरड केली नाही? असा सवाल करतानाच तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI