VIDEO : Kishori Pednekar | हिंदूत्व तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं. हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले आहे.
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं. हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाबत काही तक्रारी होत्या. केंद्र सरकारनेही सांगितलं होतं. पालिकेने यापूर्वीही राणेंना तसं कळवलं होतं हे राणेंनीच सांगितलं आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी त्यांचे काम करत आहेत. राणे त्यांना मदत करतील अशी अपेक्षा आहे, असंही महापौरांनी सांगितलं.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

