भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात

शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) या अतिशय शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र राजळेंचं वेगळंच रुप क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 22, 2021 | 11:52 AM

शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) या अतिशय शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र राजळेंचं वेगळंच रुप क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालं. कॉलेज जीवनात क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या राजळे जवळपास 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात उतरल्या आणि त्यांनी गोलंदाजी-फलंदाजी केली. मोनिका राजळे या अहमदनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. अहमदनगरमधील पाथर्डीत नगर परिषदेतर्फे एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. राजळे डॉक्टर इलेव्हन संघात सहभाग घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या होत्या. यावेळी त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगसह मैदानात फिडिंग देखील केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें