Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा

| Updated on: Jan 28, 2026 | 1:51 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी त्यांचा विमान अपघात झाला. या भीषण घटनेत अजित पवार यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि क्रू मेंबर्ससह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना, बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.

अपघाताच्या वेळी विमानात अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि प्रवासी पिंकी माळी, तसेच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक हे दोन क्रू मेंबर उपस्थित होते. मुंबईहून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले आणि ८ वाजून ४२ मिनिटांनी बारामती विमानतळापासून काही अंतरावर ते कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघात इतका भीषण होता की आगीचा गोळा आकाशात उसळला आणि विमानाचे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या एका नेत्याला गमावल्याचे दुःख व्यक्त होत आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

Published on: Jan 28, 2026 01:51 PM