16 MLAs Disqualification | 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी देणार, राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच म्हटले…
VIDEO | 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी घेणार? काय असेल प्रक्रिया? राहुल नार्वेकर यांनी सविस्तर मांडली भूमिका
मुंबई : गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय दिला. यानिर्णयानंतर राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तार आणि १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील (16 MLAs Disqualification ) निर्णय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी घेणार? काय असेल प्रक्रिया? यावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय, त्याच मी अभिनंदन करतो. म्हणत राहुल नार्वेकर म्हणाले, माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका आहेत, लवकरच निर्णय घेणार आहे. ठाकरे गटाच कोणतही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही. घाईत चुकीचा निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. 16 आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोर्टाला निर्णय घ्यायाला. 10 महिने लागले. राजकीय पक्ष कोण? हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाल तीन-सहा महिन लागले, मग मी दोन महिन्यात कसा निर्णय घेऊ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि जो निर्णय येईल, तो नियम आणि घटनेनुसारच असेल, असेही स्पष्टपणे आपले मत मांडले.
Published on: May 16, 2023 03:01 PM
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
