AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board HSC Results 2023: इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी लागणार निकाल

Maharashtra Board HSC Results 2023: इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी लागणार निकाल

| Updated on: May 24, 2023 | 2:57 PM
Share

VIDEO | इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली, 'या' तारखेला कळणार रिझल्ट

मुंबई : राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता इयत्ता बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. त्याप्रमाणे महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. Maharesult.nic.in, hsc.maharesult.org.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. यासह SMS द्वारे देखील निकाल पाहण्यासाठी आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर मेसेज सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

Published on: May 24, 2023 02:57 PM