Shivsena | दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा, सत्तेच्या समीकरणात मोठा ट्विस्ट
राज्यात दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत असून, पक्ष संघटना वाढवण्यात अपयशी ठरलेल्या काही मंत्र्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. यासोबतच सध्या राज्यमंत्री असलेल्या काही नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य फेरबदलामुळे राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. “ऑपरेशन टायगर कधी करायचे आणि काय चालू आहे, याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे. ज्या दिवशी गरज भासेल त्या दिवशी ते हा निर्णय घेतील,” असे शिरसाट म्हणाले. तसेच अनेक आमदार आणि खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करत, योग्य वेळ आल्यावर मोठा राजकीय निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आता ताकद उरलेली नाही आणि त्यांच्यातील अनेक नेते अस्वस्थ असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. या पार्श्वभूमीवर राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: May 05, 2026 01:32 PM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...