राज ठाकरे यांना आलेल्या ‘त्या’ ऑफरसंदर्भात अजित पवार थेट म्हणाले…
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अजितदादा...
कोल्हापूर, १५ ऑगस्ट २०२३ | भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं म्हटलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरात माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी अजित पवार यांना राज ठाकरे यांना भाजपने दिलेल्या ऑफरबद्दल विचारणा केल्यावर ते म्हणाले, ‘हे राज ठाकरे बोलले आहेत. मी सांगितलेले नाही. राज ठाकरे यांना भाजपने ऑफर दिली असेल, पण त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी त्यावर बोलणार नाही. भाजपने ज्याला ऑफर दिली तो त्यांचा आणि भाजपाचा विषय आहे. मी कशाला त्यात नाक खुपसू’, असे ते थेट म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

