Rush to Rallies : नुसती पळापळ… शिंदे विमानतळावर तर दादा हेलिकॉप्टरमधून उतरताच पळतच सुटले, नेमकं घडलं काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सभेसाठी उशीर झाल्याने धावपळ करावी लागली. शिर्डी येथे शिंदे विमानतळावरून पळत सुटले, तर कोपरगावमध्ये अजित पवार हेलिकॉप्टरमधून उतरताच सभेसाठी धावले. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचा हा वेग पाहायला मिळाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते आपापल्या सभांसाठी उशीर झाल्यामुळे अक्षरशः धावत सुटले. नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही धावपळ लक्षवेधी ठरली. एकनाथ शिंदे शिर्डीमधील सभेसाठी जात असताना त्यांना उशीर झाला. शिर्डी विमानतळावरून बाहेर पडताना ते थेट पळू लागले. धावपळ करत असतानाही त्यांनी एका चिमुकल्याच्या हातून फोटो फ्रेम स्वीकारली आणि कार्यकर्त्याचे उपरणेही गळ्यात घातले. पंधरा मिनिटांत सभास्थळी पोहोचण्याची त्यांची इच्छा होती, परंतु पोलिसांनी पंचवीस मिनिटे लागतील असे सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी आपला वेग आणखी वाढवला. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छही त्यांनी धावतच स्वीकारले.
दुसरीकडे, अजित पवार यांचीही अशीच लगबग पाहायला मिळाली. कोपरगावातील सभेसाठी त्यांनाही उशीर झाला. हेलिकॉप्टर कोपरगावात उतरताच, पंखा सुरू असतानाच अजित दादा खाली उतरले आणि स्वागत करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे सोडून थेट सभास्थळाकडे धावत सुटले. या दोन्ही नेत्यांची सभेसाठीची ही लगबग महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या गतीची झलक दाखवते.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

