Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हे पथक शेतीच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची, पाणीटंचाईची व चारा उपलब्धतेची पाहणी करणार आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या पाहणीनंतर सादर होणाऱ्या अहवालावर आधारित एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
महाराष्ट्रामध्ये गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाहणीसाठी एक केंद्रीय पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. या पथकाची विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली असून, आजपासून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
हे केंद्रीय पथक आजपासून शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. यात पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील दुष्काळग्रस्त भागांचा समावेश आहे. केंद्राचे हे पथक 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सखोल आढावा घेणार आहे. पाऊस, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे हा या पथकाचा मुख्य उद्देश आहे.
11 सदस्यांच्या या पथकात केंद्र शासनाच्या कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न-सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि अन्य संबंधित विभागांमधील प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकारी सहभागी आहेत. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल या पथकाचे प्रमुख आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बाजरी, तूर आणि सोयाबीन पिकांची पाहणी आज केली जाईल. तसेच, शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांमध्ये डाळिंब, ऊस, मका, तूर या पिकांसह पाणी टंचाई, टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्याची आणि रोजगार हमीच्या कामांची पाहणी केली जाईल. या पाहणी अहवालावरच दिल्लीतील केंद्र सरकार पुढील मदतीचा निर्णय घेणार आहे.
Published on: Oct 09, 2026 10:13 AM
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं

