Maharashtra Flood : उन्हाळ्यात प्यायला पाणी नाय अन् पावसाळ्यात सगळं पाण्यात… निसर्ग कोपल्यानं बळीराजानं फोडला हंबरडा
पंढरपूर तालुक्यामधल्या कासेगावात द्राक्ष शेतीला अतिवृष्टीचा फटका बसलाय शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल पीक हिरावल गेलय. आमची एकच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला जे योग्य ते न्याय द्यावा, असी साद बळीराजानं सरकारला घातलीये.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून निसर्ग कोपलाय अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यान शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. तर घरांसह साहित्याचही नुकसान झाल्यानं लोकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे. सातारा सोलापूर, जालना, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि छत्रपती, संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं शेती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. साताऱ्याच्या कराड शामगाव मधील शेतकऱ्यान शेतातल्या साचरेल्या पाण्यात बसून हंबरडा फोडलाय. आमच्या पाचवीला दुष्काळ आणि ओला दुष्काळ पुजल्याचं म्हणत इथल्या शेतकऱ्याला रडू कोसळलं. मुख्यमंत्री साहेब आम्ही काय करावं मुख्यमंत्री साहेब आम्हाला उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही. पावसाळ्यात वावरातल पाणी संपत नाही. आमचं हे सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलंय.. काय करायचं काय करू.. असं म्हणत शेतकऱ्यानं सरकारनं व्यथा मांडत आर्त हाक दिली आहे.
Published on: Sep 29, 2025 10:58 AM
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
