Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! ‘या’ 6 जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा अलर्ट, तुमचा जिल्ह्यात कसा होणार पाऊस?
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यात मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक आणि पुणे यांचा समावेश आहे. याचबरोबर नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरसह आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे
महाराष्ट्रामध्ये आज अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, राज्याच्या आठ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर (अहमदनगर), धुळे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि इतर भागांमध्येही पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

