Pandharpur Wari : वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणार 4 लाख
Pandharpur Wari News : पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना राबववण्यात येत आहे.
पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना राबववण्यात येत आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला सरकारकडून 4 लाखाची मदत मिळणार आहे. सरकारकडून यासंदर्भात नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या सुरू आहे. येत्या 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गोळा होतील. त्यासाठी राज्यातील अनेक भागांतून वारकरी वारीला जात असतात. या दरम्यान अनेकवेळा या वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे यासाठी आता सरकारकडून अशा वरकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा वारीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याला सरकारकडून 4 लाखाची मदत मिळणार आहे.

भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण

Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले

एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
