दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकांची RTPCR होणार : राजेश टोपे

मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून तसेच इतर युरोप मधून आलेल्या नागरिकांची एअर पोर्ट ऍथोरटीकडून माहिती घेऊन त्यांच्या RTPCR चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आज राज्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री यांची संयुक्त व्हीसी होणार आहे. व्हीसीमध्ये ओमिक्रॉन व्हायरस बद्दलची सतर्कता त्याच बरोबर शाळा सुरू करण्याबद्दल, राज्यातील लसीकरण या बाबीवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान तिसऱ्या लाटेच्या संदर्भात कुठल्या उपाययोजना करायच्या यावर देखील या या व्हीसी मध्ये चर्चा होणार आहे. मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून तसेच इतर युरोप मधून आलेल्या नागरिकांची एअर पोर्ट ऍथोरटीकडून माहिती घेऊन त्यांच्या RTPCR चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI