विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत

विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत

| Updated on: Jun 04, 2026 | 5:28 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि बंडखोरी पाहायला मिळाली होती.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि बंडखोरी पाहायला मिळाली होती. अनेक इच्छुक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने बंडखोरी नियंत्रणात आणण्यात मोठं यश मिळवलं आहे.

महायुतीने 17 पैकी 6 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या जागांचा त्यामध्ये समावेश आहे. पुण्यातून विक्रम काकडे, रायगडमधून अनिकेत तटकरे, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी आणि अरुण लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत.

धाराशिव, लातूर आणि बीड मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात कायम आहेत.

Published on: Jun 04, 2026 5:28 PM
Follow Us