AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut UNCUT | विधान परिषद रणधुमाळी; सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला कोणाला?

Sanjay Raut UNCUT | विधान परिषद रणधुमाळी; सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला कोणाला?

| Updated on: Apr 27, 2026 | 11:35 AM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून, 30 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता, “योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल. अर्ज भरताना तुम्हालाही आमंत्रित करू. सर्व काही सुरळीत होईल, पेढेही मिळतील,” असे राऊत म्हणाले.
“पेढे कोणाच्या नावाचे?” असा पुढील प्रश्न विचारल्यावर राऊत यांनी मिश्किल उत्तर देत, “ते नाव तुम्हाला नक्की कळेल. अनेकांच्या नावाचे पेढे वाटायचे आहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट—सर्वांचे पेढे खा; आमच्याच पेढ्यावर लक्ष का?” असा सवाल केला.
दरम्यान, गुप्त मतदानाच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी टीका करत, “या निवडणुकीत कोण कुणाचा नसतो. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावी,” असा खोचक इशारा दिला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी “ते भाजपची मतंही फोडू शकतात,” असा दावा केला.

Published on: Apr 27, 2026 11:35 AM
Follow Us