Breaking | आजपासून राज्याचं दोन दिवसीय अधिवेशन, विधानभवनात प्रवेशाआधी कोरोना टेस्ट बंधनकारक

त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. (Maharashtra legislature Assembly and council Monsoon session 2021 Today Live Update)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 05, 2021 | 9:37 AM

मुंबई : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. (Maharashtra legislature Assembly and council Monsoon session 2021 Today Live Update)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें