तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना… नवे नियम काय?
महाराष्ट्रामध्ये आता सुटे मसाले विकता येणार नाहीत, अशी घोषणा तुकाराम मुंढे यांनी केली आहे. एफडीएने लागू केलेल्या नव्या नियमानुसार मसाल्यांचे उत्पादन आणि विक्रीसाठी कठोर नियम पाळणे बंधनकारक आहे. यामध्ये पॅकिंगवर सर्व माहिती नमूद करणे आणि प्रतिबंधित रंग टाळणे आवश्यक आहे, अन्यथा दंडनीय कारवाई होईल.
महाराष्ट्रामध्ये सुटे मसाले विक्री करता येणार नाही, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. राज्यातील मसाल्यांचे उत्पादन आणि विक्रीसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नवी नियमावली लागू केली आहे. या नियमानुसार, प्रतिबंधित रंगांचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले. नवीन नियमावलीनुसार, मसाल्यांच्या पॅकिंग आणि लेबलिंगमध्ये पूर्ण पारदर्शकता अपेक्षित आहे.
प्रत्येक मसाल्याच्या पॅकिंगवर उत्पादनाचे नाव, त्यातील घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, फसाय (FSSAI) परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन किंवा पॅकिंगची तारीख आणि वापराची अंतिम मुदत किंवा बेस्ट बिफोर यांसारखी सर्व वैधानिक माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. यापैकी कोणत्याही नियमाचा भंग केल्यास, २००६ च्या कायद्यांतर्गत लागू असलेल्या नियम व नियमांनुसार कारवाई केली जाईल. यामध्ये, जर उत्पादन आरोग्यासाठी असुरक्षित आढळल्यास, सात वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
