Kolhapur Maratha Protest | मराठा समाजाचे प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ म्हणाले, “छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते. मराठा समाज फक्त राजकीय आरक्षण मागत नाही. आम्ही जी चूक केली..तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं”.

सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या (Prithviraj Chavan) काळात आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) समिती नेमून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण नाकारलं, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितलं. कोल्हापुरातील पहिल्या मराठा मोर्चात (Kolhapur Maratha Morcha) बोलताना त्यांनी ही जाहीर कबुली दिली. (Maratha Morcha Kolhapur Maharashtra Minister Hasan Mushrif said we will fulfill all demands)