Monsoon Session 2025: आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विरोधक तयार… ‘या’ मुद्द्यावरून सरकारला घेरणार?
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू, या निमित्ताने सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना मिळते. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक समोर आलं आहे. त्यानुसार आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी ११ वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे. यंदा 30 जून ते 18 जुलै या काळात राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला विरोधक चांगलंच कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. यंदा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्रिभाषा सूत्र, हिंदी भाषा विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवरून अधिवेशन गाजताना दिसणार आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

