AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मला काय विचारताय तुम्ही? शिंदे भडकले, चेहऱ्यावर राग... बावनकुळेंनी हाताला धरलं अन्...

Eknath Shinde : मला काय विचारताय तुम्ही? शिंदे भडकले, चेहऱ्यावर राग… बावनकुळेंनी हाताला धरलं अन्…

| Updated on: Jun 30, 2025 | 9:36 AM
Share

चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान शिंदेंच्या चेहऱ्यावर चांगलाच राग दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंचा हाच वाद कॅमेऱ्यात कैद झालाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मागे दिसत आहे. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?, याची माहिती काही अद्याप समोर आलेली नाही.

राज्य सरकराचं अर्थात राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. याच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल पूर्वसंध्येला राज्य सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्य सरकारने चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे हे काहिसे आक्रमक दिसत असून ते मला काय विचारताय तुम्ही लोकं..? असा सवाल बावनकुळे यांना करताना दिसताय. दरम्यान, या दोघांमध्ये कोणत्या विषयावर बोलणं सुरू होतं याची चर्चा सुरू झालीये. तर चहापानाच्या कार्यक्रमातील शिंदेंचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक ठरलं असून त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना मिळते. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Jun 30, 2025 09:36 AM