Maharashtra Rain : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान ‘या’ 17 जिल्ह्यात अतिमुसळधार, बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांना याचा समावेश आहे. नागरिकांना, विशेषतः नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांना, सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यांना 13 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या इशार्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय. तर नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक ती काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
Published on: Sep 10, 2025 10:25 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

