पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी जनतेने पॉवर कट केली, आदित्य ठाकरेंच्या सादरीकरणावर भाजपची टीका
शिवसेनेच्या (ठाकरे गट) निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळावर सादरीकरण करणार आहेत. राहुल गांधींच्या दिल्लीतील सादरीकरणाप्रमाणेच हे असेल. यावर भाजपने टीका केली असून, संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि सरकारला पुरावे पाहण्याचे आवाहन केले आहे. यात बोगस मतदारांचा समावेश असल्याचा आरोप आहे.
मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा सोमवारी निर्धार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मतदार यादीतील कथित घोळासंदर्भात महत्त्वाचे सादरीकरण करणार आहेत. दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केले होते, त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीतील अनियमितता मांडणार असल्याचे कळते. या सादरीकरणावरून आता भाजपने ठाकरे गटावर टीका केली आहे.
भाजपने म्हटले आहे की, संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्यापूर्वीच जनतेने त्यांची पॉवर कट केली आहे. या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या निवडणूक आयोगाला, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला हे सादरीकरण काळजीपूर्वक पाहण्याचे आवाहन केले आहे. 27 तारखेला होणाऱ्या या सादरीकरणात डुप्लिकेट मतदार, स्थलांतरित मतदार आणि “एका-एका घरात 100-100 मतदार” असल्याचे पुरावे सादर केले जातील, असा दावा राऊत यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मतदार यादीच्या मुद्द्यावरून नवा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

