Maharashtra Politics : भाजपचे शरद पवार दादांच्या गटात तर 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी होणारे कोण? कुणी केला रेकॉर्ड?
अकोल्याचे बळीराम सिरस्कार यांनी पाच वर्षांत पाच वेळा पक्ष बदलून नवा राजकीय विक्रम नोंदवला आहे. वंचित आघाडी, राष्ट्रवादी, भाजप, शिंदे शिवसेना आणि पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास राहिला. यासोबतच बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांचा अजित पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश, तर नांदेडमधील भाजपच्या शरद पवारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे एक नवे पर्व सध्या सुरू आहे. अकोल्यातील बळीराम सिरस्कार यांनी गेल्या पाच वर्षांत तब्बल पाच राजकीय पक्षांत प्रवेश करत एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वंचित आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि पुन्हा एकदा भाजपमध्ये परत असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. नागपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते त्यांचा पुन्हा भाजप प्रवेश झाला.
याचबरोबर, एकाच दिवशी भाजपने शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का दिला. बीडमधील योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत आपल्याला त्रास होत होता, मात्र भाजपत आल्याने मोकळा श्वास मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर दुसरीकडे, नांदेडच्या लोह्यामधील भाजपचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. भाजपच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

