आपल्या वयाचं आणि केसावरील टोपाचं त्यांनी..; संजय राऊतांची राणेंवर टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे
त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही. पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे घराण नाही तर ठाकरे यांची शिवसेना संपवणार असं नारायण राणे यांनी म्हंटलं होतं. त्यावर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी प्रत्युत्तर देत टीका केली.
यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी कोणता विडा उचलला आहे संपवून दाखवा .दहा हजार रुपयाला एक मत विकत घेतलं कसे जिंकलात हे राहुल गांधी यांनी सांगितला आहे, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील यावेळी निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार याची निर्मिती खोक्यातून झाली. त्याने घोषणा दिली ५० खोके एकदम ओके ही घोषणा कोणी दिली या घोषणाचे जनक कैलास गोरंट्याल यांनीही घोषणा दिली. विधानसभा सुरू असताना आपण सगळे तिकडे उपस्थित असताना त्या वेळेला आमदार कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे 50 खोके एकदम ओके म्हणाले, मग अख्या देशात ही घोषणा पसरली आणि आता ते देवेंद्र फडणीस यांच्या पक्षात गेलेत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

