Maharashtra Weather : मुंबईसह राज्याला IMD चा अलर्ट, कोणत्या जिल्ह्यात पुन्हा धुव्वाधार? हवामान खात्याचा अंदाज काय?
मुंबईत पाऊस जरा थांबला असल्याने रेल्वे वाहतूक आणि मुंबईसह उपनगरामधील वाहतूक सुरूळीत सुरू आहे. आज दिवसभरात कसं असणार वातावरण? पाऊस पडणार की नाही? हवामान खात्याचा अंदाज काय?
मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबईत रिमझिम पाऊस होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर मागील दोन दिवसांपासून समुद्र देखील खवळलेला राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे कालपर्यंत 4.8 मीटर उंचीच्या लाटा मुंबईतील समुद्रात उसळतांना पाहायला मिळाल्या होत्या मात्र आज सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर आज समुद्र देखील शांत असल्याचे दिसून येतंय. दरम्यान, हवामान खात्याने मुंबई, ठाणे शहर आणि उपनगराला यलो अलर्ट दिला असून दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

