वादात सापडलेली तलाठी परीक्षा अन् नोकर भरती; राज्यात परीक्षार्थी आक्रमक, थेट उतरले रस्त्यावर
सरकारच्या बदनामीसाठी घोटाळ्यांचे आरोप कराल तर गुन्हे दाखल करू असा दमच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात तरूण रस्त्यावर उतरून याप्रकरणी कारवाई करा, अशी मागणी करताय.
मुंबई, १९ जानेवारी २०२४ : वादात सापडलेल्या तलाठी परिक्षेवरून अनेक जिल्ह्यात परीक्षार्थी आंदोलन करताय. पुरवे देऊनही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय. तलाठी भरती परिक्षेत पेपर फुटी आणि गुणांचा घोळ होऊनही सरकार कारवाई करत नाही. तर परीक्षा पारदर्शक झालीये कुणाकडे पुरावे असतील तर द्या, असं आवाहन सरकारकडून केले जात आहे. यासोबतच सरकारच्या बदनामीसाठी घोटाळ्यांचे आरोप कराल तर गुन्हे दाखल करू असा दमच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात तरूण रस्त्यावर उतरून याप्रकरणी कारवाई करा, अशी मागणी करताय. संभाजीनगरच्या क्रांती चौकात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शासनाने खासगी कंपन्यांना नोकरभरतीचं कंत्राट न देता लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घ्यावी, ज्या चौकशीत पेपरफुटले त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी या आक्रमक तरूणांनी केली आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट….
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..

