Aditya Thackeray : सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
Aditya Thackeray - Disha Salian Politics : महायुतीमधील 3 नेते हे शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहेत का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दिशा सालियान प्रकरणावर या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या चर्चा सुरू झालेल्या आहेत.
महायुतीमधील 3 नेते हे शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहेत का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दिशा सालियान प्रकरणावर या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या चर्चा सुरू झालेल्या आहेत. दिशा सालियान प्रकरणावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलं की, ‘सालियान कुटुंबावर खरच दबाव होता का? त्यांच्यावर दबाव असल्याचा काही पुरावा आहे का? काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं.’ असं मुनगंटीवार म्हणाले.
तर आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचं CIDने रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. यात कोणताही राजकीय हात नाही, किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा संबंध नाही असं त्यांनी सांगितलं आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हंटलं आहे. पण या तपासावर सालियान कुटुंबाला विश्वास नसावा म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात गेले असतील. पण तपास पूर्ण झालेला असेल तर तिथून सुद्धा वेगळं काही बाहेर येणार नाही, असंही यावेळी गायकवाड यांनी म्हंटलं. तर अमोल मिटकरी यांनी, ‘या प्रकरणाला फार हवा देऊ नये. हा केवळ न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे. अधिवेशनाच्या उरलेल्या कार्यकाळात आता फक्त आणि फक्त शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या या विषयावर चर्चा व्हायला हव्या’, असं म्हंटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

