Ameet Satam | मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा

भाजप नेते अमित साटम यांनी स्पष्ट केले की मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे, महापौर पद भाजपला जाईल की शिवसेनेला, याचा फारसा अर्थ नाही. दोन्ही पक्षांचे ११८ नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चितपणे पदावर विराजमान होणार आहे.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल. महापौर भाजपचा होणार कि शिवसेनेचा हे महत्वाचं नाही असं भाजप नेते अमित साटम म्हणाले. तडजोड कारण्यासंदर्भात काही विषयच नाही आहे. भाजप आणि शिवसेनेचे 118 नगरसेवक निवडून आल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार आहे असं ठाम वक्तव्य साटम यांनी केलंय. महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं जास्त महत्वाचं आहे. मुंबई शहराचा विकास घडवणं जास्त महत्वाचं आहे. कुठल्या एका पक्षाला महापौर पद मिळणं इतकी छोटी ही निवडणूक न्हवती तर ही मुंबईच्या भविष्यतील पिढ्यांचं रक्षण करणारी निवडणूक आहे, असं देखील साटम म्हणाले.